MAHATET- 2021

MAHA TET 2021 Online Application, Eligibility, Syllabus , Exam Date


MAHA TET 2021: Exam Dates Announce, Online Application Form, Eligibility, Syllabus, Results

महाराष्ट्रशिक्षक पात्रता परीक्षा २०२१ परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज सूचना

MAHA TET 2021

MAHATET 2021: The Maharashtra State Council of Examination has announced the schedule for its Teachers Eligibility Test 2021 (TET Exam 2021). The exam will be held between 15th September to 30th December. The Maharashtra Teacher Eligibility Test will be held after a gap of two years. It is conducted to recruit teachers for classes 1 to 8. The Education Minister Varsha Gaikwad said that she is expecting over 10 lakh candidates for the exam  appear for MAHATET 2021.

शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ परीक्षेचे आयोजन १०.१०.२०२१ रोजी करण्यात आलेले आहे. तथापि त्यामध्ये covid -१९ प्रादुर्भाव व अन्य (MPSC / UPSC ) परीक्षा आयोजन या कारणामुळे बदल होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 बाबतच्या सूचना

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 परीक्षा – ( MAHATET 2021 ) ईमेल आणि नोंदणी सूचना 

Maharashtra TET 2021 : Maharashtra Teacher Eligibility Test 2021

Maha TET 2021 Schedule

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा २०२१ चे वेळापत्रक

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा – २०२१ करीता उमेदवार ऑनलाईन आवेदनपत्र भरणेसाठी दिनांक ०५/०९/२०२१ रोजी पर्यंत दिलेल्या मुदतवाढीचे प्रसिद्धीपत्रक

अ.क्र. कार्यवाहीचा टप्पा दिनांक व कालावधी
ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी ०३/०८/२०२१ ते २५/०८/२०२१ वेळ २३:५९ वाजेपर्यंत
प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे. २५/०९/२०२१ ते १०/१०/२०२१
शिक्षक पात्रता परीक्षा पेपर – I दिनांक व वेळ १०/१०/२०२१ वेळ स. १०:३० ते दु १३:००
शिक्षक पात्रता परीक्षा पेपर – II दिनांक व वेळ १०/१०/२०२१ वेळ दु. १४:०० ते सायं. १६:३०

MAHATET 2021 महाटीईटी-२०२१ उपक्रम (परीक्षार्थी): Direct Link

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२१

ऑनलाईन अर्ज भरण्याचा कृती ओघ तक्ता (Flow Chart)

१) www.mahatet.in संकेतस्थळावर भेट देणे.

२) संकेतस्थळावरील MAHATET परीक्षेसंदर्भातील सर्व माहिती, शासन निर्णय व परिपत्रके, परीक्षेचा आराखडा व अभ्यासक्रम, वेळापत्रक, परीक्षेस प्रविष्ट होण्याच्या अटी व शर्ती, आवश्यक प्रमाणपत्रे, परीक्षा शुल्क व इतर माहितीचे बारकाईने वाचन करावे.

३) सर्व माहितीचे अवलोकन केल्यानंतरच होमपेज वरील “नवीन नोंदणी” या बटनावर क्लिक करा.

४) नोंदणी विषयी सूचना काळजीपूर्वक वाचून सूचनांच्या तळाशी असलेले चेकबॉक्स (Checkbox ) वर क्लिक केल्यानंतरच “नवीन नोंदणी” या बटनावर क्लिक करा.

५) उघडलेल्या ऑनलाईन नोंदणी अर्जात दर्शवलेली माहिती प्रथम नाव, वडिलांचे नाव, आडनाव, जन्म दिनांक (एस.एस. सी. प्रमाणपत्राप्रमाणे), मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी अचूकपणे भरा.

६) नोंदणी अर्जात नमूद केलेल्या ई-मेल व मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेल्या SMS मधील TET Resgistration ID व Password द्वारे Login करा.

७) उघडलेल्या ऑनलाईन अर्जात दर्शविलेली माहिती अचूकपणे भरा, तसेच आपला नवीनतम फोटो आणि स्वाक्षरीची इमेज अपलोड करा. माहिती अचूकपणे भरल्यानंतर “Save & Preview” या बटनावर क्लीक करा.

८) स्क्रीनवर आलेली माहिती अचूक असल्याची खात्री करा.

९) Preview मध्ये काही बदल करावयाचा असल्यास Edit बटणाचा वापर करून बदल करू शकता. भरलेल्या माहितीची खात्री झाल्यास सबमिट (Save and Preview) या बटनावर क्लिक करा. (शुल्क भरल्यानंतर आवेदनपत्रामध्ये कोणताही बदल करता येणार नाही.)

१०) PAYMENT च्या पेज वर गेल्यानंतर Confirm and Pay या बटणाचा वापर करून ऑनलाईन पद्धतीने ऑनलाईन बँकिंग, क्रेडिट/ डेबिट कार्ड इ. द्वारे ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरावे लागेल. (चलनाद्वारे ऑफलाईन शुल्क भरता येणार नाही.)

११) शुल्क भरल्यानंतर आवेदनपत्राची प्रिंट विहित मुदतीत घेऊन अर्जदाराने जतन करून ठेवावी त्याकरिता Preview / Print या टॅब चा वापर करावा. तसेच Transaction History या टॅब वर क्लिक करून झालेल्या Transaction ची माहिती पाहता येइल.

१२) आवेदनपत्राची एक प्रत तुमच्या माहितीसाठी स्वतःजवळ जतन करून ठेवावी.

शिक्षक पात्रता परीक्षा ही दोन स्तरावर घेतली जाणार आहे.

  • प्राथमिक स्तर ( पेपर एक I) इ. १ ली ते इ. ५ वी वर्गासाठी अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी
  • उच्च प्राथमिक स्तर (पेपर-दोन II) इ. ६ वी ते इ. ८ वी या वर्गासाठी अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी
  • प्राथमिक व उच्च प्राथमिक या दोन्ही स्तरावर अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी दोन्ही पेपर अनिवार्य असतील.

How to fill MAHATET Application Form 2021?

  • Visit the official website www.mahatet.in.
  • Register on the portal to get the Maharashtra Teacher Eligibility Test (MAHA TET) 2021 registration Id and password to log in.
  • After getting the login credentials to log in to the portal.
  • Fill in the MAHA TET Application form 2021 carefully with all personal, professional and educational information.
  • Upload scanned copies of requisite personal, professional and educational documents.
  • Upload a passport size photograph and your signature as per the specifications given by the exam conducting authorities.
  • Review the entries made. Ensure they are a hundred percent correct
  • Pay the MAHA TET Application fee online through one of the many payment options such as net banking, credit card, and debit card
  • Print the acknowledgment for future references.

MAHATET- 2021 Application Fees:

  • Paper I – General candidates pay Rs. 500/ Concession fee is Rs. 250
  • Paper-II – General candidates pay Rs. 500/ Concession fee is Rs. 250
  • Paper I and Paper II – General candidates pay Rs. 800/ Concession fee is Rs. 400

 

MAHATET- 2021 Syllabus पाठ्यक्रम (अभ्यासक्रम)

पेपर (१) (इ. १ ली ते इ. ५ वी – प्राथमिक स्तर)

१) भाषा-१ व २) भाषा-२

या परीक्षेसाठी खालील गटाप्रमाणे भाषा-१ व भाषा-२ विषय घेता येतील.

भाषा-१ मराठी इंग्रजी उर्दु बंगाली / गुजराती / तेलुगू / सिंधी / कन्नड / हिंदी
भाषा-२ इंग्रजी मराठी मराठी किंवा इंग्रजी मराठी किंवा इंग्रजी

इ. १ ली ते ५ वी असलेला अभ्यासक्रमातील पाठ्यक्रम राहील

३) बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र :-

या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र यासंबंधी व ६ ते ११ वर्षे वयोगटाच्या विद्यार्थ्याच्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेसंबंधी असतील. याच बरोबर विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये यांच्यावर आधारीत प्रश्नांचाही सामावेश असेल. तसेच विविध विषयांच्या अध्यापन पध्दती, मूल्यमापन पध्दती यावर आधारीत प्रश्नांचा समावेश राहील.

या विषयासाठी अध्यापन शिक्षण पदविका अभ्यासक्रमावर आधारीत सध्या राज्यात सुरु असलेला विहित पाठ्यक्रम लागू राहील.

४) गणित :-

गणित विषयाशी संबंधित प्रश्न हे गणितातील मुलभूत संबोध, तार्किकता, समस्या निराकरण व गणित विषयाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान या मुद्द्यांवर आधारीत असतील.

गणित विषयाची व्याप्ती इ. १ ली ते इ. ५ वी च्या प्रचलित अभ्यासक्रमावरील असेल.

५) परिसर अभ्यास :-

परिसर अभ्यास विषयाशी संबंधित प्रश्न हे इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान, पर्यावरण या विषयातील मुलभूत संबोध व या विषयाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान या मुद्द्यांवर आधारीत असतील.

परिसर अभ्यासाची व्याप्ती इ. १ ली ते ५ वी च्या प्रचलित अभ्यासक्रमानुसार असेल. मात्र पुनर्रचित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम-२०१२ मध्ये इ. १ ली व इ. २ री ला स्वतंत्रपणे परिसर अभ्यास हा विषय नाही. परिसर अभ्यास हा विषय प्रथम भाषा व गणित या विषयामध्ये एकात्मिक पध्दतीने समाविष्ट केलेला आहे. इ ३ री ते इ. ५ वी चा प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम २००४ मधील इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान या विषयांचा पाठ्यक्रम लागू राहील.

काठिण्य पातळी :- वरील सर्व विषयांच्या इयत्ता १ ली ते ५ वी च्या अभ्यासक्रमातील घटकावर, माध्यमिक शालांत परीक्षेच्या काठिण्य पातळीचे प्रश्न असतील.

संदर्भ :-

प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम व पाठ्यक्रम

प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व पाठ्यक्रम

संबंधित विषयांची राज्य शासनाची विहित केलेली प्रचलित इ. १ ली ते १० वी ची पाठ्यपुस्तके

पेपर(२) (इ. ६ वी ते ८ वी – उच्च प्राथमिक स्तर)

१) भाषा-१ व २) भाषा-२

पाठ्यक्रमाची (Syllabus) व्याप्ती :-

या परीक्षेसाठी खालील गटाप्रमाणे भाषा-१ व भाषा-२ विषय घेता येतील.

भाषा-१ मराठी इंग्रजी उर्दु बंगाली / गुजराती / तेलुगू / सिंधी / कन्नड / हिंदी
भाषा-२ इंग्रजी मराठी मराठी किंवा इंग्रजी मराठी किंवा इंग्रजी

इ. ६ वी ते ८ वी प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमामधील संबंधित भाषेचा पाठ्यक्रम लागू राहील.

३) बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र :-

या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र यासंबंधी व ११ ते १४ वर्ष वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेसंबंधी असतील. याच बरोबर विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये यांच्यावर आधारीत प्रश्नांचाही समावेश राहील. तसेच विविध विषयांच्या अध्यापन पध्दती, मूल्यमापन पध्दती यावर आधारीत प्रश्नांचा समावेश राहील.

या विषयासाठी प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व ११ ते १४ वयोगटाशी सबंधित प्रचलित बी. एड. अभ्यासक्रमातील भाग या अभ्यासक्रमावर आधारीत विहित केलेला व सध्या राज्यात सुरु असलेला पाठ्यक्रम लागू राहील.

४ अ) गणित व विज्ञान विषय गट :-

गणित व विज्ञान विषय गटासाठी एकूण ६० गुण असून त्यापैकी ३० गुण गणितासाठी व ३० गुण विज्ञानासाठी राहतील. या विषय स्तरातील प्रश्न हे विज्ञान व गणितातील मुलभूत संबोध, समस्या निराकरण क्षमता, गणित व विज्ञानाचे अध्यापन शास्त्रीय ज्ञान या संबधीचे असतील.

प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमामधील संबंधित विषयाचा इयत्ता ६ वी ते ८ वी चा पाठ्यक्रम लागू राहील.

४ ब) सामाजिक शास्त्रे विषय गट :-

सामाजिक शास्त्रासाठी एकूण ६० गुणांचे प्रश्न असतील. सदर प्रश्न हे सामाजिक शास्त्रातील संकल्पना, आशय व अध्यापनशास्त्रीय ज्ञानासंबंधी असतील.

प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम इ. ६ वी ते ८ वी च्या अभ्यासक्रमावर आधारीत संबंधित विषयाचा पाठ्यक्रम लागू राहील.

काठिण्य पातळी :- वरील सर्व विषयांच्या इयत्ता ६ वी ते ८ वी चे अभ्यासक्रमातील घटकावर, उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या काठिण्य पातळीचे प्रश्न असतील.

संदर्भ :-

प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम इ. ६ वी ते ८ वी व पाठ्यक्रम

प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व पाठ्यक्रम

प्रचलित संबंधित विषयांची राज्य शासनाने विहित केलेली प्रचलित इ. १ ली वी ते १२ वी ची पाठ्यपुस्तके

प्रचलित बी.एड्. अभ्यासक्रम व पाठ्यक्रम

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 परीक्षा – ( MAHA TET 2021 ) सूचना